*कोकण Express*
*कणकवली नाटळ एस टी बस सेवा अनियमित येत असल्याने नाटळ सरपंच यांनी विभाग नियंत्रक डोंगरे यांना दिले निवेदन..*
*कनेडी ःःप्रतिनिधी*
कणकवली नाटळ एस टी बस गेले तीन महिने अनियमित येत असल्याने येथील ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांनी विभाग नियंत्रक डोंगरे यांना निवेदन देत येत्या आठ दिवसात बससेवा सुरळीत झाली नसल्यास ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे .
निवेदनात म्हटले आहे ,की कणकवली वरून सुटणारी एस टी बस ही गेले तीन महिने अनियमित , वेळेच्या बाहेर , व केव्हा केव्हा रद्द ही केल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते .ग्रामस्थ व नोकरदार वर्गाचे हाल होत असून आजारी व्यक्तींना खाजगी वाहनांमुळे आर्थिक भुर्दंड पडत आहे .
नाटळ थोरलेमोहूळ व धाकटेमोहूळ अशी एसटी बस पूर्वी दुपारी १२ वाजता व रात्री ७ वाजता कणकवली वरून सुटत होती ती आता अनियमित , वेळेच्या बाहेर व केव्हा केव्हा रद्द ही केली जात आहे .त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ वैतागले आहेत .
या पूर्वीही या बाबत प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती .परंतु एसटी महामंडळा ने त्याला कचऱ्याची टोपली दाखविल्याने ग्रामस्थांना नाविलाजाने हे पाऊल उचलावे लागत आहे असे निवेदनात म्हटले आहे