*कोकण Express*
*श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या विकासासाठी निधी मिळावा..*
*आ.नितेश राणेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मागणी..*
दक्षिण कोकण काशी श्री देव कुणकेश्वर देवस्थान, देवगड जि. सिंधुदुर्ग येथील परिसरातील सर्वांगीण विकास व्हावा.पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे तसेच मंदिर परिसर सुशोभिकरण करणे गरजेचे आहे, तसेच पर्यटन दृष्ट्या गावच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी मिळावा अशी मागणी भाजपा आ.नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना आज भेटून केली आहे. त्यावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.