*कोकण Express*
*मळेवाड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते रास्त धान्य दुकान येथे आनंद शिधा वाटपचा शुभारंभ*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळेवाड रास्त धान्य दुकान येथे आनंद शिधा वाटपचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्य सरकारने दिवाळीनिमित्त रेशन धारक ग्राहकांसाठी 100 रुपयात आनंद शोधा वाटप योजना जाहीर केली होती.या योजनेतील आनंद शिधा वाटप शुभारंभ मळेवाड रास्त धान्य दुकान येथे सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते व उपसरपंच हेमंत मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन धान्य ग्राहकांना वाटप करुन करण्यात आला.यावेळी उपसरपंच मराठी आणि राज्य सरकारने दिवाळीनिमित्त जाहीर केलेला आनंद शिधा हा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले असून राज्य सरकारकडून शिधावाटप केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी रास्त धान्य दुकानदार चालक उदय फेंद्रे,मंगेश नाईक,बापू मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.