समृद्धी योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग वासियांना समृद्ध करणार – किरण सामंत

समृद्धी योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग वासियांना समृद्ध करणार – किरण सामंत

*कोकण Express*

*समृद्धी योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग वासियांना समृद्ध करणार – किरण सामंत*

*किरण सामंतांचा सुनील पारकर, शेखर राणेंनी केला सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

समृद्धी योजना सदस्यपदी निवड झाल्याबद्दल किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांचा कणकवलीतील शिवसैनिक सुनील पारकर, शेखर राणे यांनी भालचंद्र महाराजांची प्रतिमा आणि शाल भेट देत सत्कार केला.पाली येथील सामंत यांच्या निवासस्थानी जात पारकर-राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी किरण सामंत यांनी समृद्धी योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दळणवळण तसेच जनतेचे महत्वाचे प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.समृद्धी योजनेच्या सदस्यपदी माझी झालेली निवड ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामी लावणार आहे असे सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!