*कोकण Express*
*सुकळवाड येथील तरुण बेपत्ता*
*मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल*
*मालवण ः प्रतिनिधी*
सुकळवाड येथील गणेश अशोक गरुड (वय 23 ) हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे वडील अशोक गरुड यांनी मालवण पोलिस स्थानक येथे शनिवारी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी सकाळी गणेश गरुड शिवसेनेच्या मोर्चासाठी घरातून निघून गेला होता. परंतु तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता गणेश न सापडल्याने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर त्यांच्या वडिलांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. पी.चव्हाण हे तपास करीत आहेत.