भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मागणीचे खासदार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी केले स्वागत

भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मागणीचे खासदार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी केले स्वागत

*चिपी विमानतळ नावाची चर्चा; नाथ पै यांचे नाव सुद्धा चर्चेत असल्याचे म्हणणे..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

बाळासाहेब ठाकरेंचे नाव सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला देण्यात यावे,या भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मागणीचे खासदार व शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी स्वागत केले आहे.
या विमानतळाला यापूर्वी सुद्धा स्थानिक शिवसैनिकांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती.तर दुसरीकडे बॅरिस्टर नाथ पै यांची नात अदिती हीने नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी केली होती.त्यामुळे नेमका कोणता निर्णय घ्यावा,याचा निर्णय मुख्यमंत्री घेतली.परंतु आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मागणीचा आपण स्वागत करतो.दुसरीकडे या विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी आणि लवकरात लवकर निर्माण होण्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न आहेत ,असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!