सोशल मीडियाचा वापर सावधानतेने करा!

सोशल मीडियाचा वापर सावधानतेने करा!

*कोकण Express*

*सोशल मीडियाचा वापर सावधानतेने करा!*

*कासार्डे येथील पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे आवाहन*

*कणकवली / प्रतिनिधी*

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपली माहिती व फोटो शेअर करू नयेत तसेच फेक कॉल मेसेज पासून सावधानता बाळगावी आपल्या बँक खात्याबाबत डिटेल्स देऊ नयेत असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले.
पोलीस स्मृतिदिनानिमित्त जुनियर कॉलेज कासार्डे येथे आयोजित कार्यक्रमात श्री. हुंदळेकर बोलत होते. यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य श्री. कुचीकर, पोलीस हवालदार किरण मेथे उपस्थित होते.
शहीद पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयाबाबत आत्मीयता निर्माण व्हावी या अनुषंगाने माहिती देण्यात आली. तसेच पोलिसांच्या विविध साहसी घटनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत जनजागृतीही करण्यात आली. सोशल मीडियाच्या वापरातील फायद्यासोबत धोक्यांबाबतही माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही अनोळखीचा कॉल आल्यास त्याची शहानिशा करावी. गंभीर बाब असल्यास विद्यार्थ्यांनी घरच्यांना, पोलिसांना कल्पना द्यावी. कोणत्याही प्रकारच्या अनोळखी, फेक कॉलला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहनही श्री. हुंदळेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!