सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्यपदी किरण उर्फ भैयाशेठ सामंत आणि माजी आम.प्रमोद जठार यांची केली नियुक्ती

सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्यपदी किरण उर्फ भैयाशेठ सामंत आणि माजी आम.प्रमोद जठार यांची केली नियुक्ती

*कोकण Express*

*सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्यपदी किरण उर्फ भैयाशेठ सामंत आणि माजी आम.प्रमोद जठार यांची केली नियुक्ती*

*मंत्री तथा योजना अध्यक्ष दीपक केसरकर यांनी केली नियुक्ती*

*मुंबई*

सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर किरण उर्फ भैयाशेठ सामंत आणि माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री तथा योजना अध्यक्ष दीपक केसरकर यांनी ही नियुक्ती केली आहे.

सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या सिंधूरत्न कार्यकारी समितीवर नियोजन विभागामार्फत २२ मार्च, २०२२ रोजी सिंधुरत्न कार्यकारी समितीवर चिपळूण येथील विधानसभा सदस्य शेखर निकम आणि कुडाळ येथील प्रफुल्ल सुद्रिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्ती रद्द करण्यात येऊन त्यांच्या ऐवजी किरण उर्फ भैयाशेठ सामंत आणि माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री तथा योजना अध्यक्ष दीपक केसरकर यांनी ही नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!