पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती रद्द

पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती रद्द

*कोकण Express*

*पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती रद्द*

*राजेंद्र दाभाडेच राहणार सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची नियुक्ती काल करण्यात आली होती. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते. परंतु पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार तूर्तास या बदलीच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नवीन नियुक्ती देण्यात आलेल्या पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी दिलेली बदली रद्द करत राजेंद्र दाभाडे यांनाच या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पदभार पुढील आदेश मिळेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडेच राहणार आहे. परंतु एका दिवसात पुन्हा अशा बदल्या रद्द कराव्या लागण्यामागे नेमकी कारणे काय त्याची उलट सुलट चर्चा सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!