*कोकण Express*
*…अन आज “अक्षरलेण” धन्य झालं*
*कासार्डे;संजय भोसले*
दि. 19 ऑक्टोबर 2022 ची दु. 3.30 वा. ची वेळ… आणि आमच्या *”अक्षरघरात”* आगमन झाल्यानंतर पहिली मिळालेली प्रतिक्रीया *”वाह…”* ही आपसुक मिळालेली प्रतिक्रीया होती *उपविभागीय अधिकारी तथा कणकवली प्रांत आदरणीय सौ. वैशाली राजमाने* यांची. विशेष असे की, कोणतेही निमंत्रण न देता मैडमांनी आमच्या *अक्षरघरा* ला दिलेली सदिच्छा भेट आणि *”अक्षरोत्सव”* बद्दल दाखवलेली आपुलकी आम्हाला आपलेपणाची वाटली.
उच्च पदस्थ व्यक्तीने आमच्या या आगळ्यावेगळया संग्रहाला अचानक भेट द्यावी, खरे तर ही गोष्टच आम्हाला भारावून टाकणारी होती. सुमारे दिड ते दोन तास केवळ आमच्या *”अक्षरोत्सव”* संग्रहातील विविध मान्यवरांची संदेश पत्रे मनसोक्तपणे पाहिली. त्यादरम्यान मैडमांचे अधूनमधुन येणारे प्रश्न जसे, मला पुन्हा एकदा माझ्या गतकाळात घेऊन जात होते, तसेच, त्यांच्यातील चिकित्सक रसिक जाणवत होता, त्यांची उत्सुकता दिसत होती आणि त्यांचे सुक्ष्म निरिक्षणही प्रतिबिंबित होत होते. त्यांच्याकडून आम्हाला अधूनमधून होणार्या सूचनाही आम्हाला अत्यावश्यक वाटल्या.
या संदेश पत्रांच्या अनुषंगाने अनेक आठवणी, अनेक भावस्पर्शी आणि सामाजिक संदेश, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर व्यक्ती यांनी सजलेल्या या संग्रहाला मैडमांची भेट म्हणजे आम्हाला तो एक अभुतपूर्व सोहळा होता. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा इतर वेळ न दवडता फक्त रसिकतेने हा संग्रह त्यांनी मनापासून पाहिला.
आणि जाता जाता या भेटीच्या निमित्ताने लिहिले…
*प्रिय निकेत,*
सध्याच्या mobile, internet च्या जगात सुमारे 1700 हून अधिक मान्यवर व्यक्तींच्या पत्रांचा संग्रह तु केला आहेस. ही निश्चितच अदभुत गोष्ट आहे.
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामें तयावरी गोंदा
या कविवर्य विं. दा. करंदीकर यांच्या स्फूर्तीदायक काव्याप्रमाणे तुझे हे *’अक्षरलेणे’* कालातीत आहे.
तुला खुप सारया शुभेच्छा.
अशा शुभेच्छा देत निरोप घेतला.
यावेळी *तळेरे मंडळ अधिकारी संतोष नागावकर, कवी, लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे, तंबाखू प्रतिबंध अभियानच्या सौ. श्रावणी मदभावे आणि सतिश मदभावे, चित्रकार अक्षय मेस्त्री, पत्रकार संजय खानविलकर, दारुम उपसरपंच भरत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, तळेरे कोतवाल रमेश तांबे, चालक श्री. जोगळे आणि सौ. सुनयना पावसकर* आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांना प्रमोद कोयंडे यांनी आपले *”सोबतीन”* हे पुस्तक तर प्रज्ञांगण परिवाराकडून दिपावलीच्या *”पणत्या”* भेट देण्यात आल्या. तळेरे गावातील हि *कलासक्त माणसे* पाहून पुन्हा एकदा तळेरे गावाला भेट देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
मैडम आपण आपल्या कार्यालयीन कामकाजातील काहीवेळ आमच्या या *”अक्षरघराला”* साठी दिलात, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा नक्की या…
*-निकेत नरहरी पावसकर*
_प्रमुख : “अक्षरोत्सव” परिवार_