*कोकण Express*
*कनेडी शिवाजीनगर येथे घरानजीक वीज पडली ; आठ जण जखमी*
*घरातील सर्व लायटिंगसह वीज उपकरणे जळली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कनेडी शिवाजीनगर येथील वेरोनिका बेरनाद फर्नांडिस यांच्या घरानजिक वीज पडून धक्का बसल्याने आठ महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर कनेडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
फर्नांडिस यांच्या घरात ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना सुरू असताना ही घटना घडली,विजांचा कडकडाट सुरू होता.लाईट गेलेली होती,त्यावेळी अचानक फर्नांडिस यांच्या घराच्या गडग्यावर विज कोसळली.यात गडग्याचे नुकसान झाले,तसेच घरातील सर्व लायटिंगसह वीज उपकरणे जळून गेली.त्यात प्रार्थनेत असलेल्या आठ महिलांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी घरात सुमारे वीस माणसे होती.कोणीतरी फोन करून कळवल्यावर हा प्रकार कनेडी बाजारपेठेत समजला.त्यांनतर अनेकांनी त्या घरी धाव घेऊन धक्का बसलेल्या महिलांना कनेडीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.उपाचारांती त्यांना घरी पाठविण्यात आले.