इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्यावतीने भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक गुरूनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दीप प्रज्वलन करून त्यांनी भात खरेदाला सुरुवात केली. यावेळी सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद्र तारी, जिल्हा बँकेचे तालुका अधिकारी गोठोसकर , विलास नाईक, सोसायटीचे व्हाइस चेअरमन लक्ष्मण कोठावळे, संचालक कृष्णा सावंत, शांताराम बांदिवडेकर, दिनेश गावडे, दिपक इन्सुलकर, आनंद राणे, श्रीमती पंडीत गटसचिव अश्विनी तावडे आदी उपस्थित होते. यावेळी भात खरेदी सुरु झाली आहे तरी शेतकर्यांनी पिशव्या नेवून भात आणावे असे आवाहन सोसायटी तर्फे करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.