*कोकण Express*
*कणकवली रेल्वे स्टेशन येथे माडाच्या झाडावर पडली वीज…!*
*रेल्वे स्टेशनवर सुदैवाने दुर्घटना टळली…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्याने ढगांचा गडगडाट होत असतानाच कणकवली रेल्वे स्टेशन वरील स्टेशन मास्तर च्या केबिन बाहेर असणाऱ्या माडाच्या झाडावर वीज पडून झाडाच्या वरील भागाने पेट घेतला. सुदैवाने जन शताब्दी एक्सप्रेस करिता अनेक प्रवासी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर थांबलेले असताना सुदैवाने जीवित हानी टळली.यानंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली.