*कोकण Express*
*डिजिटल मीडिया परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांचा सन्मान…*
*जिल्हा पत्रकार संघाकडून गौरव; उपस्थितांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांचा आज जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सावंतवाडीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, मसुदा समिती अध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, नरेंद्र देशपांडे, राजू तावडे, नागेश पाटील, सिद्धेश सावंत, शुभम धुरी, निखिल माळकर, आनंद धोंड, शैलेश मयेकर, सिद्धेश पुरलकर, भुवन नाईक आदी उपस्थित होते.