भाजपा प्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांचा कोरोना स्वाब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जठार हे सध्या आपल्या कासार्डे येथील निवासस्थानी होम आयसोलेशनमध्ये असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी कोरोना स्वाब तपासणी करून घ्यावी असे आवाहन जठार यांनी केले आहे. दोन दिवसापूर्वी कोरोनासदृश्य लक्षणे दिसू लागल्यामुळे पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलच्या लॅबमध्ये जठार यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले आहेत.