*कोकण Express*
*वीज पडून मृत्यू झालेल्या गुरव कुटुंबीयांना शासनातर्फे मदत…!*
कणकवली तालक्यातील साळिस्ते गावात वीज पडून मृत्यु झालेले पांडुरंग नारायण गुरव यांच्या कुटुंबियांना आम. नितेश राणे व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनामार्फत चार लाख रुपयांच्या तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश पांडुरंग गुरव यांच्या पत्नी प्रेमलता गुरव यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, भाजपा बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर, माजी सरपंच चंद्रकांत हर्याण, मयुरेश लिंगायत, जितेंद्र गुरव, दिनेश मुद्रस, राजा जाधव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक महादेव बाबर आदी उपस्थित होते.