८० लाख निधीतून नवीन नळपणी योजना मंजूर ; भूमिपूजन सोहळा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते संपन्न

८० लाख निधीतून नवीन नळपणी योजना मंजूर ; भूमिपूजन सोहळा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते संपन्न

*कोकण Express*

*८० लाख निधीतून नवीन नळपणी योजना मंजूर ; भूमिपूजन सोहळा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते संपन्न*

*नारींग्रे सरपंच श्रीकांत गांवकर यांनी गावाला दिलेले वचन केले पूर्ण…*

*देवगड ः  प्रतिनिधी*

निवडणुका आल्या की अनेक लोकप्रतिनिधी जनतेला आश्वासन देऊन मत मिळवण्यासाठी धडपडताना दिसून येतात एकदा का निवडून आले की
आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील
दिलेली वचने काही लोकप्रतिनिधी विसरूनही जातात तर काही लोक प्रतिनिधी दिलेला शब्द पूर्ण करतात देवगड तालुक्यातील नारीग्रे येथील सरपंच श्रीकांत गावकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला गावाला मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून देईन व गावातील रस्ते दर्जेदार करेन असे वचन दिले होते शिवसेनेचे निष्ठावंत विभाग प्रमुख म्हणून काम पाहत असलेले श्रीकांत गावकर हे नारीग्रे गावचे थेट सरपंच म्हणून पाच वर्षां पूर्वी निवडून आले, गेली अनेक वर्षे शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कम करून खासदार विनायक राऊत त्याकाळी असलेल्या शिवसेना-भाजप युतीचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर,तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत, यांच्या माध्यमातून सरपंच म्हणून गावात विकासाची गंगा आणली, गावासाठी दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला शब्द नारीग्रे सरपंच श्रीकांत गावकर यांनी पूर्ण केला असून ८० लाख निधीतून नवीन नळपणी योजना मंजूर झाली आहे या कामाचे भूमिपूजन नुकतेच शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, याशिवाय ग्रामपंचायत इमारत बांधणी साठी २८ लाख निधी उपलब्ध झाला आहे,
नारीग्रे नायकाचा व्हाळ बंधारा बांधण्यासाठी १२ लाख निधी मंजूर झाला आहे,नारीग्रे जोगलवाडी दत्तमंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी ५ लाख निधी मंजूर झाला आहे,नारीग्रे साकवा जवळ संरक्षण भिंत बांधण्यासाठी ६० हजार निधी मंजूर झाला आहे,नारीग्रे गिरावळ व्हाळ खार बंधारा ७ लाख निधी मंजूर झाला आहे,सदर विकास कामे लवकरच पूर्ण होतील मला गावाने थेट सरपंच म्हणून निवडून आणले ग्रामस्थांचा विश्वास जपून गावासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून केवळ गावाचा विकास हेच माझे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सरपंच श्रीकांत गावकर यांनी व्यक्त केले,नारींग्रे नळपाणी योजना भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते
शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते
नारींग्रे नळपाणी योजना भूमिपूजन
नारीग्रे जोगलवाडी दत्तमंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण,नारीग्रे साकवा जवळ संरक्षण भिंत बांधणे आदी विकास कामाचे भूमिपूजन पार पडले,यावेळी शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम,नारिंग्रे सरपंच श्रीकांत गावकर
ग्रा.पं सदस्य संतोष सावंत, तनिषा राणे , विद्या (सुमा) बावकर
शाखाप्रमुख दीपक पवार
युवासेना उप तालुकाप्रमुख मनोज भावे, विलास शिंदे, लऊ दळवीं
अरुण कदम राकेश कदम
बबन घाडी प्रदीप घाडी विजय कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!