*भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे मिठबांव येथे आयोजन*

 

*२६ डिसेंबर रोजी खुल्या गटात तर २५ डिसेंबर रोजी पंचक्रोशी मर्यादित होणार क्रिकेट स्पर्धा*

*संघांची नावे २४ डिसेंबर पर्यंत नोंदवावीत; विठ्ठल रखुमाई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,मिठबांव यांचे आयोजन*

*देवगड ः  प्रतिनिधी*

तालुक्यातील मिठबांव विठ्ठल रखुमाई मंदिर (आडारी बस थांबा नजीक) येथे
भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ डिसेंबर रोजी खुल्या गटात तसेच २५ डिसेंबर रोजी पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धा होणार आहेत.

२५ डिसेंबर रोजी पंचक्रोशी मर्यादित क्रिकेट स्पर्धेत (मिठबांव,तांबळडेग,हिंदळे,मोर्वे, कातवण,कुणकेश्वर, दहीबाव, नारिंग्रे) आदी गावातील संघाचा सहभाग असणार आहे.
पंचक्रोशी मर्यादित स्पर्धेसाठी बक्षिसे
पुढील प्रमाणे :प्रथम क्रमांक पारितोषिक ₹ २०००/-व कायमचषक,
द्वितीय क्रमांक पारितोषिक ₹
१००० /- व कायमचषक,
तृतीय क्रमांक पारितोषिक ₹ ५०० /- व कायमचषक. चतुर्थ क्रमांक पारितोषिक ₹ ५०० /- व कायम चषक आणि इतर बक्षिसे,

२६ डिसेंबर रोजी खुल्या गटात स्पर्धा होणार आहे यासाठी बक्षिसे पुढील प्रमाणे: प्रथम क्रमांक पारितोषिक ₹ ३००० /- व कायमचषक.
द्वितीय क्रमांक पारितोषिक ₹ २०००/- व कायमचषक.
तृतीय क्रमांक पारितोषिक ₹ ५००/-
व कायम चषक
चतुर्थ क्रमांक पारितोषिक ₹ ५००/- व कायमचषक. व इतर बक्षीसे,

या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे- प्रत्येक संघात ३ खेळाडू राहतील. स्पर्धा सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. पहिल्या फेरीतील सामने १० वाजता संपतील.उशिरा येणाऱ्या संघाला खेळवायचे की नाही ते मंडळ ठरवेल. संघांची नावे २४तारीख पर्यंत नोंदवावीत.सहभागी शुल्क मंडळाकडे जमा करून संघांना प्रवेश दिला जाईल,

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच नावनोंदणी करण्यासाठी संपर्क :
अक्षय मुणगेकर ९४२००५६०४४.
योगेश तळगावकर ९४२२१३८२८१. प्रशांत मुणगेकर ७५८८८९६४७७. राकेश पारकर ९४०३९४७४३४. संदेश डगरे ९४२२२१०३०७.

या भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी होण्याचे आवाहन
विठ्ठल रखुमाई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,मिठबांव याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!