शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा.;शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले पोलिस निरीक्षकांना निवेदन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा.;शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले पोलिस निरीक्षकांना निवेदन

*कोकण Express*

*शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करा.;शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले पोलिस निरीक्षकांना निवेदन..*

*कुडाळ ःःप्रतिनिधी*

भाजप आमदार नितेश राणे यांनी काल कणकवलीत पत्रकार परिषदेत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले असून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करा,अशी मागणी आज कुडाळ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे.तर याबाबतचे लेखी निवेदन कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्याकडे देण्यात आले.

तसेच दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,शुक्रवार,२१ऑक्टोबर २०२२ रोजी कुडाळ येथे भाजपच्या वतीने संविधान संदर्भात रॅली काढण्यात येणार असून रॅली कुडाळ शिवसेना शाखेसमोरून जाणार असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चिन्ह किंवा शिवसेना नेते यांच्याबाबत चिथावणीखोर किंवा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्यांच्यावर तत्काळ अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुढील होणाऱ्या घटनेस पोलीस प्रशासन जबाबदार असेल.यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनची असेल.असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, मंदार शिरसाट, किरण शिंदे, रुपेश पावसकर, अमित राणे, बाबी गुरव, गुरू गडकर, गोट्या चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!