वाळू चोर भास्कर जाधव यांनी पात्रता ओळखून टीका करावी

वाळू चोर भास्कर जाधव यांनी पात्रता ओळखून टीका करावी

*कोकण Express*

*वाळू चोर भास्कर जाधव यांनी पात्रता ओळखून टीका करावी*

*भाजप प्रवक्ते संजू परब यांनी राणे कुटुंबावरील टीकेचा घेतला समाचार*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी* 

राणे कुटुंबावर बोलण्याची भास्कर जाधव यांची पात्रता नाही. उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत बोलणारे भास्कर जाधव आज त्यांचीच तळी उचलत आहेत. त्यामुळे वाळुचोर भास्कर जाधव यांनी आपली पात्रता ओळखून राणेंवर बोलावं असा जोरदार हल्लाबोल भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे.

यावेळी परब बोलताना पुढे काय म्हणाले की शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंवर खालच्या शब्दांत टीका करणारा भास्कर जाधव आहे. राष्ट्रवादी सोडताना शरद पवारांवर देखील टीका केली होती. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांच्यावर बोलायची भास्कर जाधव यांची लायकी नाही. जिल्हा परिषद सदस्य असताना राणेंकडे १५ लाखांच्या मदतीसाठी ट्रॅक्टर घेऊन हात पसरणारा भास्कर जाधव हा वाळु आणि लाकूड चोर आहे. त्यावेळी राणेंनी केलेल्या मदतीची जाण भास्कर जाधव याना नाही. मंदीरात शिवीगाळ करणाऱ्या भास्कर जाधव यांना त्यांच्या मतदारसंघात लोकांनी झोडपून काढल.

यावरून तुमची मतदारसंघातील पात्रता कळते. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात येऊन अशी विधानं केल्यास वेगळ्या पद्धतीने स्वागत करू असा इशारा संजू परब यांनी दिला. तर येणाऱ्या निवडणुकांत पातळी सोडून टिका करणाऱ्या भास्कर जाधव यांच्यासह त्यांच्या पक्षाला जनतेन जागा दाखवून द्यावी असं आवाहन केलं.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,आनंद नेवगी,बंटी पुरोहित,दिलीप भालेकर,अमित परब अजय सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!