*कोकण Express*
*बाळासाहेबांची शिवसेनेचा 20 ऑक्टोबरचा मेळावा पुढे ढकलला*
बाळासाहेबांची शिवसेनेचा 20 ऑक्टोबर रोजी असलेला मेळावा R. J. मंगल कार्यालय वायरी मालवण येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची कॅबिनेट मिटिंग आयोजित केल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर उपस्थित राहू शकणार नसल्याने सदरचा मेळावा पुढे तारीख जाहीर करून घेण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसैनिकांनी आणि मालवण वासियांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षामार्फत करण्यात आले आहे