आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे शिवसेनेचा भव्य मोर्चा.

आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे शिवसेनेचा भव्य मोर्चा.

कुडाळ – मालवण चे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत कडून नोटीस आली असून त्या नोटिसीवर निषेध ! म्हणून आज मंगळवार १८ ऑक्टोंबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुडाळ येथे शिवसेना शाखा कुडाळ पासून लाचलुचपत कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत.या मोर्चाला महविकास आघाडीने ही सहभाग दर्शविला आहे.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार वैभव नाईक यांना अँटी करप्शन ब्युरो यांनी चौकशीसाठी नोटीस दिली.याच्या विरोधात हजारो महाविकास आघाडीचे नेते,जिल्ह्यातून कुडाळ येथे पदाधिकारी,कार्यकर्ते दाखल झाले आहेत.दरम्यान या मोर्चाला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित झाले आहेत.आणि शिवसेना कुडाळ शाखा ये शिवसैनिक मोठ्या घोशणा बाजी करताना दिसत आहे.

दरम्यान यावेळी पोलीस यंत्रना देखील सतर्क झाली आहे.आणि या मोर्चा दरम्यान कालच भाजप ने कुडाळ पोलीस आणि कुडाळ तहसिलदार यांना निवेदनाद्वारे सांगितले आहे की,आमच्या भजच्या नेत्यावर घोषणाबाजी झाल्यास आम्ही जश्यास तसे उत्तर शिवसेनेला देऊ यामुळे ऐकनदर हा मोर्चा कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!