*कोकण Express*
*मालवणात “आय लव्ह मालवण” सेल्फी पॉइंटचे लोकार्पण*
*आ वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले उद्घाटन*
*मालवण ः प्रतिनिधी*
पर्यटन नगरी मालवण शहरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रॉक गार्डन मध्ये नगरपालिकेमार्फत आणि आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून निर्माण करण्यात आलेल्या ‘आय लव्ह मालवण’ या सेल्फी पॉईंटचे आज आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आपल्यासोबत मालवणची आठवण राहावी यासाठी मालवणच्या पर्यटनाचे आकर्षण असलेल्या रॉक गार्डन मध्ये ‘आय लव्ह मालवण’ या सेल्फी पॉईंटची निर्मिती मालवण नगरपालिकेकडून करण्यात आली आहे. या हा सेल्फी पॉईंट पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. या सेल्फी पॉईंटच्या लोकार्पणप्रसंगी माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मनोज मोंडकर, सौ. पूनम चव्हाण, सौ. पूजा तोंडवळकर यांच्यासह येवला येथील प्रा. रमेश पैलवान, पैठणी व्यावसायिक राजेंद्र वडे आदी व इतर उपस्थित होते.
मालवण शहरात सुशोभीकरणासाठी आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. रॉक गार्डनमध्ये यापूर्वी डेकोरेटिव्ह लाईट, म्युझिकल फाउंटन निर्माण करण्यात आले आहे. रॉक गार्डनमध्ये ‘आय लव्ह मालवण’ हा सेल्फी पॉईंट होण्याच्या दृष्टीने सन २०२०- २१ ला ८ लाख रु. जिल्हा पर्यटन निधीची मागणी करण्यात आली होती आणि यास ३१ मार्च २०२१ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. यासाठी आमदार वैभव नाईक यांनीही पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला होता. हे काम पूर्ण होऊन आज लोकार्पण झाले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.