*कोकण Express*
*राजापूरात केळीच्या सोपांपासून साकारणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे प्रतिबिंब*
यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. हाच धागा पकडून राजापूर शहराची ग्रामदेवता श्री निनादेवीच्या 59 व्या नूतन मुर्ती प्रतिष्ठापना दिनी आयोजित श्री सत्यनारायण पूजेत केळीच्या सोपांची आरास केली जाणार आहे. त्यातून स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब साकारले जाणार आहे. मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी हा मुर्ती प्रतिष्ठापना दिन साजरा होत आहे.
दरवर्षी ग्रामदेवता श्री निनादेवीचा मुर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन साजरा केला जातो. यावेळी होणाऱ्या श्री सत्यनारायण पूजेच्या आरासीमध्ये वेगळेपण पाहायला मिळते. यापूर्वी ही या मंडळाने केळीच्या सोपांपासून प्रसंगोचित प्रचलित विषयांना धरून आरास साकारून लक्ष वेधले होते. भारतीय सैन्याने मिळविलेल्या विजयानंतर केळीचा सोपाचा रणगाडा करत जवानांना आदरांजली वाहिली होती. तर केळीच्या सोपांपासून शंकराची पिंडी, रणगाडा, मारूती 800 कार, मोबाईल प्रतिकृती, डायनोसर, हेलिकॉप्टर, मगर, सुमो गाडी, हत्तीसह अंबारी अशा विविध कलाकृती साकारल्या होत्या.
यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणपती आरास, नवरात्र आरास, गणपती वीसर्जन मिरवणुका अशा वेगवेगळया निमित्ताने त्याचे प्रतिबींब साकारताना पाहायला मिळाले. याचे औचित्याने यावषीर् हा अमृत महोत्सवाचा देखावा साकारण्याचा मानस निनादेवी मंदिर व्यवस्थापनाने केला आहे. यात 75 च्या अंकात सत्यनारायण पूजेची आरास साकारली जाणार आहे. तर भारताच्या भव्य नकाशात राज्या राज्यातून स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांची गाथा मांडली जाणार आहे. तर या अनुषंगाने माध्यमिक विभागातील शालेय विद्याथ्यार्साठी आगळी वेगळी स्पधार् आयोजीत करण्यात आली आहे. या संपुर्ण आरासीवर आधारीत परिक्षण या विद्याथ्यार्नी करावयाचे आहे. त्यासाठी इयत्ता 5 वी ते 8 वी व 9 वी ते 12 वी अशा गटात ही स्पधार होणार आहे.
तरी भाविकांनी दर्शनासह, तीर्थ प्रसादाबरोबरच या कलाकृती पाहण्यासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन निनादेवी मंदिर व्यवस्थापनाचे वतीने करण्यात आले आहे