*कोकण Express*
*अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासना अंती नगरसेवक श्री. शिशिर परुळेकर यांचे उपोषण तूर्तास मागे*
कणकवली शहरातील नागरिक श्री. बाळकृष्ण शांताराम तावडे वय वर्ष-७० रा. टेंबवाडी, कणकवली यांचा दि . २९ ऑगस्ट २०२२ रोजी कणकवली बसस्थानका समोर विद्युत पोलास स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. सदर मृत्यूदाराच्या वारसदारांना नुकसान भरपाई मिळणाच्या संदर्भात सोमवार दिनांक : १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता उपोषणाचा इशारा दिला होता. या विषयात नॅशनल हायवे चे अधीक्षक अभियंता श्री. लक्ष्मीकांत जाधव यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मार्ग काढल्यामुळे तूर्तास हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. आज कणकवली नगरपंचायत दालनात मा. नगराध्यक्ष समीरजी नलावडे व मा. उप नगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण कर्ते नगरसेवक शिशिर परुळेकर, हायवे खात्याचे प्रतिनिधी श्री. रुपेश कांबळे, मृताचे वारस श्री. मनोज तावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक किशोर राणे, श्री. अभय राणे, श्री. महेश सावंत, श्री. अजय गांगण, श्री. राजू गवाणकर आदी उपस्थितीत होते. वीज वितरणाचे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांचा या प्रकरणातील अहवाल रखडल्यामुळे पुढील प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे तो अहवाल तत्परतेने घ्यावा असे नमूद करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भ्रमणध्वनी द्वारे हायवे चे अधीक्षक अभियंता श्री. लक्ष्मीकांत जाधव यांच्याशी संपर्क साधून विस्तृत चर्चा केली. त्याच प्रमाणे कणकवली शहरात अनेक स्ट्रीट लाईट यांना शॉक येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे असे म्हणणे नगराध्यक्ष यांनी मांडले त्यावर श्री. कांबळे यांनी कणकवली शहरातील सर्व पोलचे इन्स्पेकशन करण्यात येईल असे उत्तर दिले. त्याचप्रमाणे कणकवली शहरातील सर्व बंद स्ट्रीट लाईटची समस्या, रात्रीच्या वेळेस टायमर लाऊन बंद करण्यात येतात. हि समस्या मांडण्यात आली. त्याचप्रमाणे खात्याचे कनिष्ठ अभियंता श्री. रुपेश कांबळे यांनी स्वतः जाऊन स्पॉट सर्वे करून सदर प्रकार घातक असल्याचे मान्य केले. माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. संदेश सावंत यांच्याशी श्री. रुपेश कांबळे यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून झालेल्या चर्चेची माहिती दिली. पुढील ८ ते १० दिवसांत बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबियास नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा चर्चे अंती निर्णय झाला.