*कोकण Express*
*साळीस्ते येथील गुरव कुटुंबियांना नीतेश राणेंकडून मदत*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
परतीच्या मुसळधार पावसात वीज पडून मृत्यूमुखी पडलेले साळीस्ते येथील पांडुरंग नारायण गुरव यांच्या कुटुंबांयांची आमदार नीतेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. राणे यांनी गुरव कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी तेथीलच मारूती गुरव यांच्या घरी जाऊन आजारपणाची चौकशी करत आर्थिक मदतही केली. याप्रसंगी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर, उपसरपंच बाळासाहेब पाटिल, चंद्रकांत हर्याण, मयुरेश लिंगायत, प्रशांत बारस्कर, जितेंद्र गुरव, सचिन ताम्हणकर, नरेश ताम्हणकर, पप्या मेस्री, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.