*कोकण Express*
*हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान !*
*‘हलाल’ उत्पादनांच्या सक्तीविरोधात कणकवली येथे आंदोलन !*
कणकवली -गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्ड्स, केएफ्सी, बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या त्यांच्या आऊटलेटमध्ये हलाल नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकत आहेत. भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. भारताला धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांच्या इस्लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे श्री. विष्णू कदम यांनी उपस्थित केला.
हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाच्या दिवाळीत ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पटवर्धन चौक, कणकवली येथे सोमवारी सायंकाळी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आले.
या प्रसंगी श्री. विष्णू कदम पुढे म्हणाले की, ‘मॅकडोनाल्ड्स’, ‘के.एफ्.सी’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील त्यांची फूड आऊटलेट १०० टक्के ‘हलाल प्रमाणित’ आहेत, असे घोषित केले आहे. ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये जाणार्या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार बनवण्यात आलेले ‘हलाल’ पदार्थ देणे, हा हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर आहे. भारतातील हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य का नाही ? कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती खपवून घेणार नाही. याचसमवेत हल्दीराम, हिमालया, नेस्ले यांसारख्या अनेक कंपन्या त्यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करावी, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत.
हिंदू जनजागृती समितीचे श्री हेमंत मणेरीकर म्हणाले की, सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ , वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘ हलाल ‘ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे . ही मागणी केवळ मांसापुरतीच मर्यादित राहिली नसून धान्य , फळे , सौंदर्यप्रसाधने , औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत , अशी मागणी मुसलमान करत आहेत . त्यासाठी व्यापाऱ्यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी ५० ते ६० सहस्र रुपये भरून ‘ हलाल ‘ प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे , तर ‘ जमियत – उलेमा – ए – हिंद ‘ यांसारख्या मुसलमान संघटनांकडून दिले जाते . यामुळे हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे . त्यासाठी आपण ही दिवाळी हलाल मुक्त वस्तूंची खरेदी करून करूया. समितीच्या कु. दिव्या शिंत्रे यांनी देश सेक्युलर असताना मोठी आस्थापना हलाल प्रमाणित वस्तू विकत घेण्याची बळजोरी करत आहेत, असे म्हणणे मांडले. उपस्थित हिंदू बांधवांनी ‘बहिष्कार घाला, बहिष्कार घाला, हिंदूंनो ‘हलाल’ प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घाला’, ‘चला हिंदूंनो, संकल्प करूया.. “हलाल-मुक्त दिवाळी” साजरी करूया’, ‘देशाच्या रक्षणासाठी…हलाल वस्तूंवर बहिष्कार घाला’, ‘उठा उठा दिवाळी आली, हलाल वस्तूंवर बहिष्कार टाकायची वेळ आली’ आदी घोषणा दिल्या. कु. नीना कोळसुलकर यांनी सूत्रसंचालन केले.
आपला विश्वासू,
श्री. हेमंत मणेरीकर
हिंदू जनजागृती समितीकरिता
(सं.क्र. 9699014048)