मोर्चा एसीबी कार्यालयावर नको तर खास.राऊत यांच्या घरावर काढला पाहिजे ;  आम.नितेश राणे

मोर्चा एसीबी कार्यालयावर नको तर खास.राऊत यांच्या घरावर काढला पाहिजे ;  आम.नितेश राणे

*कोकण Express*

*मोर्चा एसीबी कार्यालयावर नको तर खास.राऊत यांच्या घरावर काढला पाहिजे ;  आम.नितेश राणे *

*कणकवली ः प्रतिनिधी*

वैभव नाईक यांच्या विरोधातील तक्रार प्रदीप भालेकर याची होती. भालेकर हा शिवसेनेचा कार्यकर्ताआहे. तो खासदार विनायक राऊत यांचा चाहता आहे. राऊत यांनी त्याला वसईमध्ये घर दिलं आहे. विनायक राऊत यांच्या जवळ असलेला व्यक्ती वैभव नाईक याच्या विरोधात तक्रार करतो. त्यामुळे मोर्चा एसीबी कार्यालयावर नको तर खासदार राऊत यांच्या घरावर काढला पाहिजे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

श्री.राणे म्हणाले, प्रदीप भालेकर याने ट्विटरवर देखील सांगितलंय माझ्या तक्रारीनंतर वैभव नाईक याच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याबाबतचे पुरावे देखील त्याने दिले आहे. तसेच कुणीही माहितीच्या अधिकारातून वैभव नाईक यांच्यावर कारवाई कुणाच्या तक्रारीवरून झाली याची माहिती घेऊ शकतो. त्यामुळे नाईक यांच्यावरील कारवाई वरून राणे कुटुंब अथवा भाजप पक्षावर होणारी टीका चुकीची आहे. वस्तुत: शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडूनच वैभव नाईक यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर श्री. नाईक यांची चौकशी सुरू होऊन कारवाई सुरू झाली आहे. यामध्ये नारायण राणे, नीतेश राणे आणि भाजप यांचा काहीही संबंध नाही असेही श्री.राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!