*तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी शिवसेना परीवारात सहभागी व्हा*

*कोकण Express*

*शिवसेना तालुका संघटक संजय गवस*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रम माटणे जि.प व झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघातील खोक्रल गावात आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपतालुका प्रमुख दशरथ मोरजकर,विभाग प्रमुख लक्ष्मण आयनोडकर,विजय जाधव,युवासेना ता.अधिकारी भिवा गवस,महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी,तालुका प्रमुख श्रेयाली गवस,अरविंद गवस,माजी शाखा प्रमुख बाळा गवस,जेष्ठ शिवसैनिक सुरेश गवस आदी उपस्थित होते.यावेळी खोक्रल नूतन शाखा प्रमुख म्हणून महादेव गवस यांची निवड करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना गवस यांनी सांगितले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.. राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.. संपूर्ण जगाबरोबर आपल्या राज्यात ही कोरोना सारखे महाभयंकर संकट आले,पूर,वादळी संकट अशा अनेक समस्या तोंड देत शासन चालवत आहे.. महिला,युवकाचा रोजगारासाठी अनेक योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ आपण घेतला पाहिजे. सिंधुदुर्ग तसेच दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध आहे,अनेक विकास कामे मार्गी लागली आहे,शिवसेना खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक भाई केसरकर,यांनी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा विडाच उचलेला आहे..वैद्यकीय महाविद्यालय, आडाळी औद्योगिक क्षेत्र यासारखे प्रकल्प लवकरच सुरु होणार आहेत.. या विकास प्रवाहाबरोबर सहभागी होण्यासाठी आपण सदस्य नोंदणी करून शिवसेना परिवारात सहभागी व्हावे असे भावनिक आवाहन ही संजय गवस यांनी केले..यावेळी श्रेयाली गवस.व दशरथ मोरजकर यांनी ही मनोगत व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!