*कोकण Express*
*डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निष्ठेचा आदर्श घेऊन जीवनात काम करा -अजयकुमार सर्वगोड*
*सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
समाजात नवी दृष्टी देण्याचे काम माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. एक उत्तुंग व्यक्तिमत्व भारत देशाता प्राप्त झाले, त्यांच्या महत्त्वकांक्षा आणि कार्याप्रती असलेल्या निष्ठेचा आदर्श घेऊन जीवनात काम करा. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड केले. सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालय, विभाग कणकवली येथे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोठ बोलत होते. ते म्हणाले वाचनाने विचार समृद्ध होतात आणि ज्या प्रदेशात समृद्ध विचार आहेत तोच प्रदेश आर्थिक रष्ट्या पुढे गेलेला आहे. त्याच राज्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेले आहे. एकीकडे इंग्रजीचा प्रभाव आणि व्यावसायिक भाषा म्हणून तिची असलेली गरज लक्षात घेताना, मराठीची संस्कृती आणि मराठी मातृभाषा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठीही पुस्तक वाचन गरजेचे आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी स्वतःच्या जगण्यातूनच समाजाला प्रबोधन केलेले आहे. त्यांचे जीवन चरित्र वाचा आणि करा असे आवाहन यावेळी श्री सर्वगोड यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाच्या विचार मंचावर उप अभियंता गणेश कर्वे, उपअभियंता विनायक जोशी, उप अभियंता कुमुदिनी प्रभू प्रहार वे पत्रकार संतोष राऊत, प्रथम श्रेणी लिपिका, जितेंद्र पराठकर, आरेखक आनंद कासार्डेकर, शाखा अभियंता प्रमोद कांबळे, रवींद्र किंजवडेकर, निवृत्त अधिकारी मनोज परब, प्रणिता कोचरेकर यांनी आपले विचार मांडले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुस्तक वाचनाचे महत्त्व विशद करतानाच सर्व कर्मचारी, अधिकान्यांनी साने गुरुजी “खरा तो एकची धर्म या कवितेचे वाचन केले. प्रणिता कोचरेकर यांनी साने गुरुजीच्या जीवनात एका प्राचे वाचन केले.