ब्रेन ट्युमर ची यशस्वी शस्त्रक्रिया…… आरिफ बगदादी यांचे विशेष सहकार्य.

ब्रेन ट्युमर ची यशस्वी शस्त्रक्रिया…… आरिफ बगदादी यांचे विशेष सहकार्य.

*कोकण Express*

*ब्रेन ट्युमर ची यशस्वी शस्त्रक्रिया…… आरिफ बगदादी यांचे विशेष सहकार्य.*

*पडेल, तालुका देवगड मधील रुग्णाला मदतीचा हात.*

*स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान आणि फेहमीदा मॅडम यांचे मोलाचे सहकार्य.*

*केंद्रीयमंत्री राणे साहेब, आमदार नितेश राणे साहेब, यांचा भक्कम पाठिंबा.*

देव माणसात भेटतो याची प्रचिती पुन्हा एकदा भाजपा जिल्हा सरचिटणीस मा. आरिफभाई बगदादी व पडेल येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीक यांच्या रूपाने पाहायला मिळाली. राजकारणापलिकडचे समाजहित जपत आरिफ बगदादी आणि वैभव वारीक या जोडगोळीने पडेल गावातील एका रुग्णाला जीवनदान देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
देवगड तालुक्यातील पडेल, नरगोलवाडी येथील दत्ताराम मणचेकर यांच्या मेंदूला गाठ असल्याचे निदर्शनास आले होते. सदर गाठ दिवसेंदिवस मोठी होत असल्याने मणचेकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. तसेच सदर गाठ काढून टाकण्याचा खर्च सुद्धा सुमारे सहा लाखांपेक्षा जास्त होता. आणि दत्ताराम मणचेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हा खर्च करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते.
या आजाराची माहिती श्री दत्ताराम यांचा मुलगा मयूर मणचेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीक यांना दिली. आजाराचे गांभीर्य ओळखून वैभव वारीक यांनी तात्काळ मयूर मणचेकर यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस मा. अरिफभाई बगदादी यांच्याशी भेट घडवून आणली. त्यावर बगदादी यानी सदर ऑपरेशन मुंबई येथे मोफत करून देण्याचे आश्वासन दिले.
आरिफ बगदादी यांनी मुंबई येथील स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान साहेब यांना संपर्क केला. जाहिद खान साहेब यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दत्ताराम मणचेकर यांची मुंबई येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सदर शस्त्रक्रिया स्वाभिमान ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण मणचेकर यांची स्थिती अतिशय उत्तम असून त्यांचे कुटुंबीय सुद्धा समाधानी आहेत.
सुमारे सहा लाख रुपये खर्च असणारी ही शस्त्रक्रिया मोफत केल्याने मणचेकर कुटुंबीय यांनी आमदार नितेश राणे आणि राणे कुटुंबीय , अरिफभाई बगदादी, जाहिद खान, फेहमीदा मॅडम यांनी शतशः आभार व्यक्त केले आहेत. सदर शस्त्रक्रिया मोफत करून आणि आपल्याला जीवनदान दिल्याबद्दल आमदार नितेश राणे आणि अरिफभाई बगदादी यांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही असेही दत्ताराम मणचेकर यांच्या कुटुंबीय यांनी सांगितले. तसेच यामध्ये विशेष पाठपुरवठा करणारे सामाजीक कार्यकर्ते वैभव वारीक आणि स्वप्नील पुजारे यांचे सुद्धा आभार मणचेकर यांनी व्यक्त केले.
आरिफ बगदादी हे राजकारणा पलीकडे जाऊन समाजकार्य करत आहेत. आजपर्यंत त्यांच्यामुळे कॅन्सर, हृदयरोग, ब्रेन ट्युमर, मणक्याच्या समस्या अशा अनेक गंभीर आजारावर सोळा ते सतरा रुग्णांवर मोफत उपचार झाले आहेत. त्यांच्या या मानवतेच्या कार्याला संबंधित कुटुंबीय शतशः सलाम करत आहेत.
हे समाजसेवेचे कार्य केंद्रीयमंत्री नारायण राणे साहेब, आमदार नितेश राणे साहेब, आणि राणे कुटुंबीय तसेच जाहिद खान साहेब यांच्यामुळे शक्य असल्याचे आरिफ बगदादी आवर्जून सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!