*कोकण Express*
*युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांचा माझी खा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…*
मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न निवासस्थानी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांच्या उपस्थितीत आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला. युवकांची मजबूत फळी उभारून पक्ष संघटना सक्षम करताना समाजाला दिशा देणारे काम करा, अशा सूचना श्री. राणे यांनी यावेळी दिल्या.