*कोकण Express*
*रणजित देसाई; राज्य सरकार जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याचा आरोप…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त ठेवून राज्य सरकार जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आज येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काम चांगले आहे. असे असताना डिसेंबर अखेरपर्यंत पदे भरली गेल्यास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी घेऊन जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
