*कोकण Express*
*भैयाशेठ सामंतांचे देवगडात ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत*
*बाळासाहेबांच्या शिवसेना देवगड शाखेचे भैयाशेठ यांच्या हस्ते झाले उदघाटन*
*देवगड ः प्रतिनिधी*
आगामी लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार भैयाशेठ सामंत यांचे देवगडमध्ये ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. भैयाशेठ सामंत यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना देवगड शहर शाखेचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. भैयाशेठ यांची देवगड तालुक्यातील मच्छीमारांनी भेट घेत निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी भैय्याशेठ यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांशी मोबाईलवर चर्चा करत तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी विलास साळसकर, अमोल लोके, पी टी पेडणेकर, संजय आग्रे, संदेश पटेल, भास्कर राणे, भूषण परुळेकर,सुनील पारकर, बाळू पारकर ,दामू सावंत आदी उपस्थित होते.