वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; भाजपाचे वर्चस्व कायम

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; भाजपाचे वर्चस्व कायम

*कोकण Express*

*वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; भाजपाचे वर्चस्व कायम*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले आहे.
या निवडणुकीमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक रावराणे व्यक्तिगत मतदार संघातून, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सीमा शरदचंद्र नानिवडेकर स्त्री राखीव मतदारसंघातून, जिल्हा बँक माजी संचालक गुलाबराव चव्हाण भटक्या जमाती मतदार संघातून, दिगंबर श्रीधर पाटील माजी संचालक सिंधुदुर्ग बँक संस्था मतदारसंघातून, अंबाजी भागू हुंबे माजी उपसभापती वैभववाडी पंचायत समिती संस्था मतदार संघातून, संजय शिवाजी रावराणे भाजपा माजी तालुका अध्यक्ष व्यक्तिगत मतदार संघातून, पुंडलिक साळुंखे माजी सरपंच कुसुर व्यक्तिगत मतदारसंघातून, जयसिंग हनुमंत रावराणे माजी सरपंच अचिर्णे व्यक्तिगत मतदार संघातून, महेश रावराणे ग्रामपंचायत सदस्य नावळे व्यक्तिगत मतदार संघातून, उज्वल सहदेव नारकर सरपंच अरुळे इतर मागास मतदारसंघातून, अनंत रवींद्र इंदुलकर माजी सरपंच तिरवडे तर्फे सौंदळ, सुहास शशिकांत सावंतमाजी तालुका अध्यक्ष भाजपा व्यक्तिगत मतदार संघातुन, रंजीता रवींद्र रावराणे सामाजिक कार्यकर्त्या स्त्री राखीव मतदार संघातून, रवींद्र यशवंत पवार सामाजिक कार्यकर्त्या करूळ अनुसूचित जाती मतदार संघातून, पांडुरंग राजाराम पाटील सामाजिक कार्यकर्ते नापणे संस्था मतदार संघातून वरील सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!