*कोकण Express*
*जमावबंदी आदेशाचा भंगप्रकरणी संदेश पारकर यांच्या सह पाच जण निर्दोष*
*ऍड. अशपाक शेख यांचे यशस्वी युक्तिवाद*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना बेकायदेशीर रित्या एकत्र जमत जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीची मत मोजणी चालू होती. दरम्यान त्या दिवशी मत मोजणी सुरु असताना नुतन पत्रकार भवन इमारती समोरील बॅरीकेट जवळ महाविकास आघाडीचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले होते. तेथे पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमून त्यांनी फटाके लावले व मोठमोठ्याने घोषणा दिल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला व फटाके वाजवून शांततेचाही भंग केला म्हणून संदेश भास्कर पारकर, रिमेश अशोक चव्हाण, भास्कर बाबाजी राणे, राजू नरेश राठोड, सचिन प्रकाश सावंत यांचेवर भा.द.वि. कलम १४३ व १४९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्ह्याचा ठपका ठेवलेला होता.
सदर कामी वरील नमूद १ ते ५ संशयित आरोपींचे विरुध्द सबळ पुरावा आला नसल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी ओरोस श्री. ए. एम. फडतरे यांनी पाचही आरोपींची र्निदोष मुक्तता केली. संशयीत आरोपींच्यावतीने ऍड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.