*कोकण Express*
*शिवसेनेचे खासदार, आमदार शिल्लक राहिलेले उपनेते स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत यांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवून नये*
*ए जी डॉटर्सला एक इंच जागाही दिलेली नाही ; शिवसेनेचे उपनेते म्हणून खोत यांनी राज्यातील प्रश्नांवर बोलावे…*
*आमच्यावर टीका करण्याआधी विचार करा अन्यथा तुमचे सगळे कारनामे जनतेस समोर आणू*
*उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांची खोत यांच्यावर जोरदार टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासोबत शिल्लक सेनेचे उपनेते, स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत हे ए जी डॉटर्स झिरो वेस्ट प्रकल्पाबाबत गैररसमज पसरवत आहेत. ए जी डॉटर्स ला एक इंच जागा अद्याप कणकवली नगरपंचायत ने दिलेली नसल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे उपस्थित होते. ए जी डॉटर्स सोबत झालेल्या करारानुसार वार्षिक भाडे 3 लाख 54 हजार व डिपॉझिट 6 लाख 58 हजार ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्यांना 3 एकर जागा भाड्याने देण्याचे ठरले आहे. मात्र त्यांनी अद्याप जागाभाडे नगरपंचायत ला न दिल्यामुळे 27 जुलै 2019 ला पहिले व 12 फेब्रुवारी 2020 रोजी दुसरे स्मरणपत्र डिपॉझिट व भाडे भरण्याबाबत दिलेले आहे. मात्र त्याला ए जी डॉटर्स ने त्याची पूर्तता केली नसल्यामुळे एक इंच जागाही ए जी डॉटर्स ला दिलेली नाही. बेस्ट मध्ये अनेक झोल करून आणि खंबाटा मध्ये घपला करणाऱ्या खासदारांना बाजूला बसवून उगीच मोठा आव आणू नये. शिवसेनेचे उपनेते म्हणून खोत यांनी राज्यातील प्रश्नांवर बोलणे सोडून कणकवली सारख्या छोट्या नगरपंचायत वर टीका केल्यामुळे कणकवली नगरपंचायत ची उंची वाढली आहे. आम्ही खोत यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे यापुढे आमच्यावर टीका करण्याआधी विचार करा अन्यथा तुमचे सगळे कारनामे बाहेर काढू असा इशाराही हर्णे यांनी दिला.