*कोकण Express*
*देवगड येथे सेल्फी पॉईंटचे आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते लोकार्पण…!*
*देवगड ःःप्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात देवगड बस स्थानक समोर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण आज गुरुवार १३ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. सेल्फी पॉईंटने देवगडच्या पर्यटन सौंदर्यात भर पडणार आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या माध्यमातून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे, उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुलराव राणे, संदेश पारकर, सतीश सावंत शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग युवासेना अधिकारी सुशांत नाईक, महीला जिल्हा संघटीका निलम सावंत-पालव, देवगड जामसंडे नगराध्यक्ष साक्षी प्रभू , नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, नगरसेवक विशाल मांजरेकर, नगरसेवक संतोष तारी आदींसह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत,
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी केले आहे.