*कोकण Express*
*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ञ म्हणून डॉ. निर्मला सावंत यांची नियुक्ती…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील उपजिल्हा रुग्णालय हृदयरोग तज्ञ म्हणून डॉ. निर्मला सावंत या हजर झाल्या आहेत. डॉ. अभिजीत चितारी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे अनेक रूग्णांची गैरसोय सुद्धा होत होती. याच पार्श्वभूमी सावंतवाडीतील नागरिकांनी केलेल्या मागणीनंतर त्या ठिकाणी सौ. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान ही सेवा त्या “ऑन कॉल” देणार आहेत.
डॉ. सावंत ह्या मूळच्या सावंतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मुंबई येथील जे. जे. शासकीय रुग्णालय येथे झाले. जे. जे. रुग्णालयामध्ये त्यांनी हृदयरोगतज्ञ ही पदवी प्राप्त करून त्याठिकाणीच काही वर्ष अनुभव घेऊन त्यानंतर कोल्हापूर (इचलकरंजी) येथे खाजगी रुग्णालयामध्ये काही वर्ष सेवा बजावली. तर पाच वर्षांपूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा रुग्णांची सेवा केली. त्यानंतर काही घरगुती अडचणीमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. सध्यस्थितीमध्ये रुग्णांच्या तपासणीसाठी त्यांचा खाजगी दवाखाना मच्छी मार्केट जगन्नाथराव भोसले शाळा नंबर ३ च्या समोर आहे.
तरी ही त्या उपजिल्हा रुग्णालया मध्ये ऑन कॉल हृदयरोग तज्ञ म्हणून सेवा बजावणार आहेत.
यामध्ये हृदयविकार ,उच्च रक्तदाब, मधुमेह ,अनेक प्रकारच्या गंभीर तापाचे रुग्ण तपासणार आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्या तपासणीची वेळ ११:३० ते १:३० पर्यंत राहील.