नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी शिवसेनेतर्फे ८ जाने.ला आमरण उपोषण

*कोकण Express*

*नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी शिवसेनेतर्फे ८ जाने.ला आमरण उपोषण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते .मात्र एक वर्ष लोटूनही अद्याप जमिन मोजणे व निस पुरणे या पलिकडे काहीच हालचाल न झाल्याने नांदगाव शिवसनेतर्फे संबधित विभागाला पुन्हा आंदोलनाची नोटीस बजावण्यात आली असून जर याबाबत १५ दिवसात निर्णय न झाल्यास १५ दिवसानंतर 8 जानेवारी 2021 ला सकाळी 10.30वा. पासून नांदगाव तिठा येथे शिवसेनेतर्फे आमरण उपोषणास बसणार असल्याचे नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर यांनी दिले आहे. कणकवली तालूक्यातील नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्यात असले तरी अजून बॉक्स वेलच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे .नांदगाव तिठा ,नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे . सर्व्हीस रस्त्यांच्या मागणीसाठी मागील वर्षी ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठया प्रमाणात आंदोलन केले होते .मात्र जादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस पुरण्यात येण्यापलीकडे काहीच हालचाल दिसत नाही .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रीया थांबली होती . येथे जमिन मालकांचे म्हणने की, जादा जागा संपादनाचा आम्हाला मोबदला द्या आणि सर्व्हीस रस्त्याचे काम सुरू करा .आता पाऊसही गेलेला आहे .तेव्हा हे सर्व्हीस रस्ते होणार कधी ? असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला असून एकाच सर्व्हीस रस्त्याने दोन्ही कडील वाहतूक सुरू असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे .तरी याबाबत आपण लक्ष देवून प्रश्न सोडवावा अशी मागणी आहे .तसेच एकाच सर्व्हीस रस्त्याने सर्व वाहतूक होत असल्याने त्यात मुख्य मुंबई गोवा वाहतूकही पुलाचे काम पूर्ण नसल्याने सुरू आहे .यामुळे पर्णत: नांदगाव तिठा परिसरात धुळीचे साम्राज्य पसरून आरोग्यास हानिकारक झालेले आहे .तरी याबाबत १५ दिवसात निर्णय न झाल्यास १५ दिवसानंतर 8 जानेवारी 2021 ला सकाळी 10.30वा. पासून नांदगाव तिठा येथे शिवसेनेतर्फे आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .याबाबत त्यांनी लेखी निवेदन कणकवली येथील उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी कणकवली यांना दिले असून त्यांची प्रत संबधीत हायवे विभाग व कणकवली पोलीस यांना देण्यात आलेली आहेत. नांदगाव येथे दिशा फलक लावण्यात यावेत नांदगाव ओटव फाटा व नांदगाव तिठा अशी दोन बॉक्स ब्रीज आहेत .तसेच हुमरठ व साकेडी फाटा येथे ही तसेच असल्याने कोल्हापूर अथवा फोंडाघाट येथे जाणारा प्रवासी रस्त्यात दिशा फलक नसल्याने चूकून नांदगाव ओटव माईण ब्रीज या अर्ध्या सर्व्हीस रस्त्याने येथ पर्यंत येतो . मात्र पुढील मार्गच अस्तीत्वात नसल्याने पुन्हा मागे फीरून पुलावरून मार्गस्त होतो .तसेच नांदगाव तीठा येथून देवगड ,कुणकेश्वर मार्ग असल्याने नांदगाव तीठा ब्रिज कुठला व नांदगाव ओटव फाटा ब्रिज कुठला हेच समजत नसल्याने देवगड व कुणकेश्वरच्या दिशेने जाणारी वाहने नांदगाव तिठा म्हणून नांदगाव ओटव फाटा येथून सर्व्हास रस्त्याने वाहने येत आहेत .यात मोठी सुध्दा वाहने असतात अशा वेळी त्यांना पुन्हा मागे वळवते वेळी खुप कसरत करावी लागत आहे कारण सर्व्हीस रस्ता ही अपूर्ण स्थीतीत आहे .यासाठी नांदगाव ओटव माईण फाटा येथून ब्रिज चालू होते तेथे देवगड ,कुणकेश्वर असे दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत यावर येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.तरी याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशा आशयाचे निवेदनही शिवसेनेतर्फे शाखा प्रमुख राजा म्हसकर यांनी संबधीत विभागाला दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!