*कोकण Express*
*गुरू सत्यमामुनी यांचे अध्यात्मिक, मेडिटेशन शिबिर गोव्यात
15 ऑक्टोबर रोजी होणार शुभारंभ*
*सहभागी होण्याचे प्रा.राजाराम परब यांचे आवाहन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
दक्षिण भारताचे प्रसिद्ध अध्यात्मिक व मेडिटेशन गुरु सत्यमामुनी यांच्या प्रथम मेडिटेशन शिबिरात गोवा आणि कोकणातून प्रतिसाद मिळाला. अनेकांच्या मागणीनुसार या शिबिराचा दुसरा टप्पा १५ ऑक्टोबर रोजी पणजी गोवा येथील हॉटेल फिडाल्गो येथे आयोजित करण्यात आला आहे. श्री सत्यमामुनी स्वामीजी यांच्या प्रत्यक्ष सुश्राव्य वाणीतून आणि मार्गदर्शनातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरुपात मेडिटेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती परफेक्ट अकॅडमीचे प्राध्यापक डॉ. राजाराम परब यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली. मेडिटेशनची आवड असणाऱ्यांना श्री सत्यमामुनी यांच्याकडून शास्त्रोक्त धडे घेण्याची ही चांगली संधी आहे, असेही ते म्हणाले.
पहिल्या टप्प्यात दि. १५ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्री सत्यमामुनी स्वामीजी यांच्या प्रत्यक्ष सुश्राव्य वाणीतून आणि मार्गदर्शनातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरुपात मेडिटेशन घेण्यात येईल.
या शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या दिवसापासून ते ४१ व्या दिवसापर्यंत ऑनलाइन मेडिटेशन क्लासेस, झूम मिटींग व व्हॉट्सॲप क्लास घेण्यात येणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे शिबिराच्या ४२ व्या दिवशी प्रत्यक्ष मेडिटेशन गुरू श्री सत्यमामुनी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या मेडिटेशनसंदर्भात शंकांचे निरसन केले जाणार आहे, असे डॉ. परब यांनी सांगितले.
दरम्यान, याच कालावधीत श्री सत्यमामुनी स्वामीजी यांचा स्वानुभव आणि सान्निध्यातून आलेले मेडिटेशनचे फायदे आणि सुयोग्य प्रात्यक्षिके यांचा प्रत्यक्षरित्या अनुभव देणारा मेडिटेशन वर्ग घेण्यात येईल. संपूर्ण माहिती व शिबिराच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण गोष्टींबद्दल अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. राजाराम परब 9325017458 यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
मेडिटेशनमुळे जीवनात आमूलाग्र बदल
मेडिटेशनमुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. मनाच्या शांततेसाठी आणि दैनंदिन कार्याच्या सुयोग्य परिपूर्ततेसाठी मेडिटेशन अत्यंत उपयुक्त आहे. अनेकांच्या मागणीनुसार श्री सत्यमामुनी यांच्या शास्त्रोक्त मेडिटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रा. डॉ. परब यांनी सांगितले.