*कोकण Express*
*तलाठी उत्तम कदमला 3 दिवस पोलीस कोठडी ; निलंबनाची कारवाई अटळ*
*देवगड ः प्रतिनिधी*
सात बारावर नोंद घालण्यासाठी 3 हजारांची रोख रक्कमेची लाच स्वतःच्या हाताने स्विकारताना अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या दाभोळे सजा येथील तलाठी उत्तम गंगाराम कदम याना विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 3 दिवस पोलीस कोठडीत रवानगी झाल्यामुळे उत्तम कदम यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. सातबारावर नोंद घालण्यासाठी फिर्यादीकडून 3 हजारांची लाच घेताना तलाठी कदम यांना स्वतःच्या उजव्या हाताने स्विकरताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. आज उत्तम कदम याना विशेष जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी लोकसेवक उत्तम कदम यांनी फिर्यादीकडे सात बारावर नोंद घालण्यासाठी 3 हजार रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याचे डिजिटल व्हाईस रेकॉर्ड ध्वनिमुद्रित झाल्याचे न्यायालयासमोर नमूद केले. आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. या गुन्ह्यात अन्य लोकसेवक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आहे काय याचा तपास करायचा आहे, आरोपीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करायची आहे, त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील देसाई यांनी केली. त्यानुसार आरोपी उत्तम कदम यांची 3 दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.