किरण उर्फ भैयाशेठ सामंत १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार

किरण उर्फ भैयाशेठ सामंत १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार

*कोकण Express*

*किरण उर्फ भैयाशेठ सामंत १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार*

*देवगड,मालवण,कुडाळ व कणकवली तालुक्याला देणार भेटी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आगामी लोकसभा निवडणूकीतील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जातात. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांचा १५ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने प्रथमच ते राजकीय पार्श्वभूमीवर जिल्ह्याला भेट देणार आहेत.
किरण सामंत यांच्या या पहिल्यावहिल्या राजकीय व संघटनात्मक दौऱ्यामुळे कार्यकर्त्यां मध्ये चैतन्य असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत.

१५ ऑक्टोबर रोजी किरण ऊर्फ भैय्याशेठ सामंत हे सकाळी १० वाजता देवगड शाखा येथे भेट देणार असून कार्यकर्त्यांशी संघटनावाढी बाबत चर्चा करणार आहेत. दुपारी ११:३० वाजता ते आचरा येथील राजन पांगे यांच्या घरी भेट देणार असून देवस्थान कमिटी चर्चा आणि चिरे – वाळू संघटना यांच्या सोबत चर्चा करणार आहेत असे सूत्रांकडून समजते.
दुपारी १२ वाजता ते आचरा येथील हॉटेल राणे शाही येथे भेट देत कार्यकर्त्यांशी संघटनावाढी बाबत चर्चा करणार आहेत. दुपारी २ वाजता मालवण हॉटेल रामेश्वर, सागरी महामार्ग येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संघटनावाढीबाबत संवाद साधणार आहेत, दुपारी ३ वाजता मालवण देवबाग संगम येथे भेट देऊन धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी करणार आहेत तर सायंकाळी ४:३० वाजता कुडाळ येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
सायंकाळी ५:३० वाजता कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत. संध्याकाळी ते कोकणकन्या एक्स्प्रेस रेल्वेने रत्नागिरीला रवाना होणार आहेत असे सूत्रांकडून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!