*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून लढणार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली असून, आगामी सर्व निवडणुका आम्ही युती मधूनच लढवणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आगामी स्थानिक पातळीवर होणाऱ्या सर्व निवडणुका युती म्हणून लढविण्यासाठी चर्चा झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आम्ही एकत्र लढणार आहोत. त्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी चर्चा झाली आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
तसेच ते बोलताना पुढे म्हणाले जिल्हाला तीन मंत्री मिळाले आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सिंधुदुर्गचा विकास केला जाईल. रस्ते ,उद्योग आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सिंधुदुर्गातील स्वच्छतेचा पॅटर्न त्या ठिकाणी राबवणार आहे. आणि त्यात यशस्वी झालो तर त्याचे सर्वस्वी श्रेय जिल्हावासियांना असेल, असेही ते म्हणाले.