*कोकण Express*
*मनाई आदेशाचा भंग केल्याचा गुन्ह्यातून भाजपच्या सहा जणांची निर्दोष मुक्तता…*
ओरोस ता.११-:३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीची मत मोजणी चालू होती . दरम्याने त्या दिवशी मत मोजणी सुरु असताना समता बाजार दुकानासमोरील रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले होते .
तेथे पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमून त्यांनी फटाके लावले व मोठमोठ्याने घोषणा केल्या . तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला व फटाके वाजवून शांततेचाही भंग केला म्हणून तुकाराम चंद्रकांत साईल , श्रीपाद पुंडलिक तवटे , शुभम दिलीप राणे , मनोरंजन नारायण सावंत , विनोद विजय सावंत , विनायक जनार्दन अणावकर यांचेवर भा.द.वि. कलम १४३ व १४ ९ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्ह्याचा ठपका ठेवलेला होता. या कामी वरील नमूद १ ते ६ आरोपींचे विरुध्द सबळ पुरावा आला नसल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी ए . एम . फडतरे यांनी सहाही आरोपींची र्निदोष मुक्तता केलेली आहे . संशयीत आरोपींच्यावतीने अॅड . अशपाक शेख व अॅड . मनिषा नरे यांनी काम पाहिले.

