*कोकण Express*
*खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात संगणक प्रयोग शाळेचे उध्दाटन*
जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शैक्षणिक संकुलात सुसज्ज अशा संगणक लॅबचे उद्घाटन केले खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण व वेदांता फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण आणि शेठ न. म. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संगणक प्रयोगशाळाचे उध्दाटन नुकतेच कोकण वैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मुंबई येथील उद्योजक सुनील खाडये यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात केले गेले.
सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व्यवसाईक सामाजिक जबाबदारी (सी.एस.आर.) संकल्पना-अधिष्ठित वेदांत फाउंडेशन, मुंबई यांनी १० संगणक उपलब्ध करून दिले.
या संगणक प्रयोग शाळेतून सीसीसी+, ऍडव्हान्स टॅली, कम्प्युटर अपलिकेशन्स, ऍडव्हान्स एक्सेल, डी.टी.पी., वेब डिझायनिंग, डॉट नेट, सी-लैंग्वेज कोअर जावा, एस.क्यू.एल. / पी.एल. इत्यादी असे अभ्यासक्रम शिकवले जातील. या अभ्यासक्रमाचा फायदा संकुलातील सर्व अध्ययन व अध्यापन करणार्यांना नक्कीच होईल असे मत संस्थाध्यक्ष प्रविण लोकरे यांच्याकडून सह-आभार व्यक्त केले.
या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, खारेपाटण संस्था संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी.कांबळे, शेठ न.म.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक संजय सानप, मुंबई येथील उद्योजक देवेंद्रजी हलवाई, जय नारायण सिंह, हेमंत मेहता, सुधाकर बिडवाकर, शत्रूग्न ओझा, खारेपाटण सोसायटी व्हाईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, प.पु. भलचंद्र महाराज नगरी सहकारी संस्थेचे राजेंद्र ब्रम्हदंडे, खारेपाटण शिक्षण संस्थेचं संचालक दादा कर्ले, भाऊ राणे, राजेंद्र वरूनकर, संदेश धुमाळे, विजय देसाई, योगेश गोडवे, प्रशांत गुळेकर आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या उध्दाटनाचे प्रास्ताविक संंअथा संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी केले.
ही प्रयोगशाळा पूर्णत्वास नेण्यासाठी वेदांता फाउंडेशनचे विभागीय समन्वयक मदेश नागरे यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.