*कोकण Express*
*कणकवलीत माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत कणकवली शहरामध्ये दिनांक 10 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळात 18 वर्षावरील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेमध्ये, हिमोग्लोबिन रक्तदाब, मधुमेह, वजन , उंची, बी एम आय या तपासण्या होणार आहेत. कणकवली शहरात वेगवेगळ्या दिवशी होणार असून बांधकरवाडी, निमेवाडी, मधलीवाडी मधील महिलांकरिता 11 ऑक्टोबर रोजी जि. प. शाळा क्रमांक 2 मध्ये, कांबळे गल्ली टेंबवाडी, फौजदारवाडी सिद्धार्थनगर व बाजारपेठ 2, याकरिता 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये शिबीर होणार आहे. गांगीवाडी, सोनगेवाडी करिता जि. प. शाळा 1 मध्ये 13 ऑक्टोबर रोजी शिबिर घेतले जाणार आहे. तर जळकेवाडी, शिवाजीनगर, नाथ पै नगर, परबवाडी करिता 14 ऑक्टोबर रोजी जि. प. शाळा क्रमांक 5 मध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. साईनगर, वरचीवाडी, शिवशक्तीनगर, समर्थनगर करिता 15 ऑक्टोबर रोजी प्रतीक्षा प्रकाश सावंत यांच्या घराजवळ शिबीर होणार आहे. तर कनकनगरकरिता 17 ऑक्टोबर रोजी शिवशक्ती हॉल येथे शिबीर होणार आहे. बिजलीनगर व महामार्ग लगत रहिवासी महिलांना महायज्ञ कॉम्प्लेक्स मध्ये
18 ऑक्टोबर रोजी शिबिर होणार आहे. तर तेली आळी व हर्णेआळी करिता 19 ऑक्टोबर रोजी कणकवली पंचायत समिती येथे शिबिर घेतले जाणार आहे. तरी कणकवली शहरातील 18 वर्षावरील सर्व महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, कणकवली व नगराध्यक्ष समीर नलावडे, तसेच मुख्याधिकारी अवधूत तावडे आदींनी केले आहे.