*कोकण Express*
*वर्षावासाची जिल्ह्यात मोठ्या दिमाखात सांगता सोहळा*
*कासार्डे;संजय भोसले*
दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी अश्विनी पौर्णिमेदिवशी वर्षावास समारोपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले . बौद्ध धम्मात आषाढी पौणिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व असून गेले तीन महिने जिल्ह्यात उपरोक्त संस्थेच्यावतीने जिल्हा , तालुका व गावस्तरावर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले .
वर्षावास कार्यक्रमाचा समारोप करताना जिल्हा , तालुका शाखेच्या पदाधिकारी यांनी विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले .
*कुडाळ तालुका – निरुखे* येथे या दिवशी आयु श्रीकृष्ण सरपे या संपूर्ण कुटुंबाला बौद्ध धम्माची दिक्षा देऊन त्याच गावी वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष आयु हरिश्चंद्र कदम , संस्कार प्रमुख – आयु .सिताराम सोनवडेकर , आयु . सुर्यकांत बिंबवणेकर गुरुजी , संघटक – विष्णू अणावकर उपस्थित होते .
*मळगाव सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्हा मुख्य संघटक आयु आनंद कदम , संघटक आयु संजय पाटील , उपविभाग सावंतवाडी अध्यक्ष आयु चंद्रकात जाधव , सावंतवाडी अध्यक्ष – बाळकृष्ण जाधव *हरकूळ बु ता . कणकवली* येथील कार्यक्रमास जिल्हा महासचिव आयु ए डी कांबळे , १कोषाध्यक्ष आयु नंदकुमार कासले , कणकवली अध्यक्ष सतीश धामणकर उपस्थित होते .
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात वर्षावास कार्यकमाची सांगता करण्यात आली .