*कोकण Express*
*दत्तात्रय मारकड सर,कासार्डे हायस्कूल यांचे राष्ट्रीय पंच परीक्षेत अभिनंदनीय यश*
*कासार्डे;संजय भोसले*
शिक्षक भारतीचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हा सचिव आणि मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड सर,कासार्डे हायस्कूल यांनी खंडाळा जि.पुणे येथे कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या मान्यतेने आणि कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्यावतीने आयोजित कराटे राष्ट्रीय पंच परीक्षेत अभिनंदनीय यश संपादन करीत राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.त्यांना वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच शाहिन अख्तर,महासचिव संदीप गाडे,राज्य तांत्रिक समितीचे अध्यक्ष अनुप देठे, यांचे मार्गदर्शन लाभले.
दि.८ व ९ ऑक्टोंबरला हे प्रशिक्षण शिबीर डी.सी. स्कुल खंडाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेला एकुण ३२जिल्हातील १००पेक्षा अधिक मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षक सहभागी झाले होते.त्रिवार अभिनंदन शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग