*कोकण Express*
कासार्डे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत सावंत यांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते आंतरराज्य शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान…!
*कणकवली ः प्रतिनिधी*
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत उर्फ बाबू सावंत यांना बेळगावी येथील रुलर डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ अँड नॅचरल डेव्हलपमेंट सोसायटी बेळगावी या संस्थेच्यावतीने गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य अंतर्गत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘आंतरराज्य शैक्षणिक गौरव पुरस्कार सन-२०२२’ने सन्मानित करण्यात आले आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मैसुर फेटा व चंदनाचा हार घालून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर
माजी खास.आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर,आम. निलेश लंके, माजी आम. संजय पाटील, माजी खास. अमरसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावर, विलासराव पाटील, राजस्थानाचे डॉ.पवन शर्मा,श्री.शेख आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर तसेच सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर,स्थानिक व्यवस्था समिती आणि शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य मधुकर खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशांत सावंत यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.